Home राजकीय कुडवा व सोनपूरी येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

कुडवा व सोनपूरी येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

0

गोंदिया,दि.29ः-राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथिल जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम कुडवा व सोनपूरी येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्राम कुडवा येथील सर्वश्री सोमेश उपवंसी, गौरव पटले, सावन चौधरी, नूतन तांडेकर दिगंबर देशमुख, आशिष बावनथडे, अशपाक शेख, पुरुषोत्तम बोपचे, विकास खोटेले, देवा पटले, वसिम शेख, सोहम शेंडे, शाहरुख शेख, राहुल नेवारे, पंकज राऊत, सुशील पटले, सचिन पटले, भीम राऊत, भूमेश्वर राऊत, देवेंद्र माटे, सुमित चौरे, दीप रहांगडाले, राहुल बडोले तसेच सोनपुरी येथील सर्वश्री रमेश धनराज धुवारे, महेंद्र रामचंद धुवारे, योगराज कपूरचंद धुवारे, ओमराज ओमकार साव चौरागडे, भैय्यालाल नत्थू चौरागडे, लॉमेंद्र ओमप्रकाश तुरकर, बुधरामजी जियालाल कावळे, जागेश्वर रहांगडाले सहीत अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा घालून सर्वांचे स्वागत करण्यात आले. केले व या प्रवेशामुळे पक्ष संघटना मजबूत व पक्षाची ताकद वाढणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे व कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहाल या सह पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.या यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, रविकांत बोपचे, बाळकृष्ण पटले,लोकपाल गहाणे, केतन तुरकर,उध्दव मेहदंळे, पवन पटले, संतोष लिलारे, राजू बावनथडे, महेश तांडेकर, सुनील पटले, शैलेश वासनिक,नागरत्न बंसोड, रौनक ठाकूर, कपिल बावनथले,सोनू येडे,नरेंद्र बेलगे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version