Home राजकीय भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे 4 मार्च रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे 4 मार्च रोजी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात

0

कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
गोंदिया, –भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात प्रथमच 4 मार्च रोजी आगमन होत आहे. यानिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात दुपारी 2 वाजता विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रस्तरीय कबड्डी स्पर्धा, परीक्षा पे चर्चा स्पर्धेचे बक्षीस वितरण, धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन एसएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्धाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. प्रमुख अतिथी म्हणून खा. सुनील मेंढे, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. विजय रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, प्रदेश सचिव संजय पुराम, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले,  माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, माजी आ. भेरसिंह नागपुरे, माजी आ. खोमेश रहांगडाले, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, अशोक इंगळे, रचना गहाणे, जिप गटनेता लायकराम भेंडारकर, जिप सभापती संजय टेंभरे, सविता पुराम, रुपेश कुथे, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, राष्ट्रीय आदिवासी आघाडी सदस्य लक्ष्मीकांत धानगाये, भाजप उपाध्यक्ष विजयाताई कापगते, ज्येष्ठ नेते ग्यानीराम बारसागडे, अण्णा डोंगरवार तसेच जिपचे आजी व माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमापूर्वी दुपारी 12 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे व एव्हरग्रीन ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 8 ते 10 मार्च दरम्यान सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील चोपा येथे महिला व पुरुष गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम सामना अर्जुनी मोर येथे होईल. पुरुष गटातील प्रथम बक्षीस 41 हजार 1 रुपये, द्वितीय 31 हजार 1 रुपये, तृतीय 21 हजार 1 रुपये व चतुर्थ बक्षीस 11 हजार 1 रुपयाचे तर महिला गटातील प्रथम बक्षीस 31 हजार 1 रुपये, द्वितीय 21 हजार 1 रुपये, तृतीय 11 हजार 1 रुपये देण्यात येणार असून कबड्डी संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रम व कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Exit mobile version