मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टीचे नागपुरात आंदोलन

0
18

नागपूर-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले असल्याचा निषेध करण्यासाठी आपने व्हेरायटी चौकात सत्याग्रह केला. सीबीआयच्या माध्यमातून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.

नागपुरात व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात व नागपूर संयोजक कवीता सिंघल, विदर्भ सहसंयोजक अमरीश सावरकर, पश्चिम विदर्भ सहसंयोजक संजय हेडाऊ, विदर्भ हेल्थविंग संयोजक डॉ. शाहीद अली जाफरी, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, राकेश उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह करण्यात आला.