तिरोडा येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची सभा जल्लोषात

0
16

तिरोडा- खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रवादी युवा काँग्रेस संपर्क दौराची तिरोडा शहर व ग्रामीण क्षेत्र बैठक, आश्रम शाळा मेंढा जिल्हा अध्यक्ष केतन तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.सभेला सर्व जिल्हा परिषद क्षेत्राच्या युवकांनी सहभाग घेतला.पाऊस असूनही मोठ्या प्रमाणात उपस्थित ही प्रफुल्ल पटेल यांच्यावर असलेला युवकांमधील विश्वास दाखवणारी व लाक्षणिक होती.
केतन तुरकर यांनी हर बूथ यूथ या संकल्पनेवर आधारित संगठन वाढ करावी अशी विनंती युवकांना केली.अजय गौर हे शहर बैठकीत प्रमुख मार्गदर्शक होते.तर रविकांत बोपचे व डॉ योगेन्द्र भगत यांनी ग्रामीण बैठकीत प्रमुख मार्गदर्शन केले.
सभेच्या आयोजनात डॉ. संदीप मेश्राम, अतुल भांडारकर, निशी रहांगडाले, राहुल गहरवार पिंटू उके, पंचायत समिती सदस्य विजय बिंझाडे,अलकेश मिश्रा यांच प्रमुख सहभाग होता .
सभेला प्रामुख्याने सर्वश्री. राजलक्ष्मी तुरकर, मनोज डोंगरे, जगदीश बावनथदे, किरण पारधी, रामसागर धावडे, y t कटरे, नीता रहांगडाले, राजू भोयर, दहिकर जी , रीता पटले, सुनील पटले, नागोराव बनसोड, दिनेश साखरे, प्रशांत बालसंनवर , गुलाब कटरे, तोंडीलाल शरणागत, राजेश तुरकर शुभम शेंडे, राहुल सहारे, निखिल कुमार, देवेंद्र सुखदेवे, धीरज चौरे सहित असंख्य तरुण उपस्थित होते.