पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने सामान्यांचे तारणहार – विजय शिवणकर

0
13

#भाजप पक्षाची सौंदड येथे आढावा बैठक संपन्न

 सडक अर्जुनी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य नेहमी जनसामान्यांचे विचार करून असतात, त्यांच्या कार्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षातील कार्यकाळात अनेक कार्य असे झाले जे नेत्रदीपक आहेत. आगामी सर्व निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्यांना प्रत्येक घरापर्यंत पोचविण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे, असे विधान विजय शिवणकर यांनी मंचावरून केले. ते सौंदड येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात सामान्य जनतेसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचवून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा. मोफत राशन, प्रत्येक घरी वीज, हर घर नळ योजना, जन धन खात्यांच्या माध्यमाने बँकिंग प्रणाली सोबत जोडणे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये १०% आरक्षण देणे, स्वानिधी योजनेतून पथ विक्रेत्यांना आर्थिक मदत आणि कर्ज वाटप योजना, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत आणि १ रुपयात पीक विमा योजना अंतर्गत संपूर्ण क्षेत्रातील पिकांचा बिमा करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, कौशल्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास योजना राबवली, युवकांसाठी उद्योगाची व्यवस्था करणे, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना, स्टँड उप इंडिया सारख्या योजनांचा युवकांना लाभ मिळवून देवून रोजगार निर्मिती करण्यासारखे कार्य नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. या सर्व माहिती नागरिकांना मिळवून देणे हे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे असेही यावेळी लोकसभा प्रमुख विजय शिवणकर यांनी मंचावरून माहिती दिली.यावेेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली टेंभुर्ने, उपसभापती शलींदर कापगते, पंचायत समिती सदस्य वर्षा साखरे, सरपंच हर्ष मोदी, तंटामुक्ती अध्यक्ष चरणदास शहारे, शक्ती केंद्र प्रमुख तालुका महामंत्री गिरिधारी हत्तीमारे, पुरोशोत्तम निंबेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वनाथ रहांगडाले, ग्राम पंचायत सदस्य रंजना भोई, शक्ती केंद्र प्रमुख मदन साखरे, सुधाकर चांदेवार, दीपक गहाने, बूथ प्रमुख तुळशीराम लंजे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.