
भव्य बाईक रैली व जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करून खा.श्री पटेल यांचा भव्य स्वागत
गोंदिया – खासदार प्रफुल पटेल यांचा मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रैली व कार्यकर्त्यांकडून जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. एन.एम.डी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने जोश व उत्साहात उपस्थिती दर्शवून खासदार प्रफुल पटेल यांच्याप्रती विश्वास व एकजुटता दाखवून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. खा.प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.
गोंदिया व भंडारा जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा विचार केला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा म्हणजे माझे कुटुंब आहे. या कुटुंबात कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी व शेतमजूर सक्षम व्हावा समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. विकासासाठी जे काल झाले तेच आज झाले तर त्यात गैर काय.शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना प्रफुल पटेल यांनी दिली.
राज्यातील सन २०१९ च्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले नव्हते. तेव्हा जनतेने विरोधात बसण्याचा जनादेश दिला होता. मात्र तेव्हा राज्याच्या विकासासाठी कट्टरवादी असलेल्या शिवसेनेशी (ठाकरे) आघाडी करुन सत्तेत सहभागी होण्यात काहीच गैर नाही वाटले नाही.मग आम्ही सुद्धा राज्याच्या विकासासाठी युतीत सहभागी झालो मग आता विरोध का केला जात आहे, असा सवाल खा. प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांचे नाव न घेता केला.
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरुवारी (दि.२४) नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले युतीत सहभागी होण्याचा निर्णय आम्हा एक दोन नेत्यांचा नव्हता तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. आजही आमच्या सोबत पक्षाच्या ५३ पैकी ४३ आमदार अधिकृतपणे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाचा यावर निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरच येणार असून त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाची बाजू भक्कम आहे आणि कोणासोबत किती जण हे देखील स्पष्ट होईल असे देखील पटेल यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती
मागील ९ वर्षात देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रगती साधली आहे. जगात आज भारताचे नाव आदराने घेतले जाते. भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती साधली असून देशाने त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. आम्ही सुद्धा विकासासाठी एनडीएसोबत असून आगामी निवडणुकीत जास्तीत एनडीएचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केल्या असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.
मी निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा नाही हे वेळच ठरवेल
मी राज्यसभेचा सन २०२८ पर्यंत खासदार आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय मी आता जाहीर करणार नाही. आता आम्ही युतीत सहभागी झालो असून तिन पक्षांच्या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. यावेळी जो उमेदवार ठरेल त्याच्या पाठीशी भक्कपणे उभे राहू. मी निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा नाही हे वेळच ठरवेल.
पवार आणि पटेल कुटुंब एकच
खा. शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. पण कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा आजही कायम आहे व तो यापुढेही कायम राहिल. यात कसलीही कटुता येणार नाही कारण पवार आणि पटेल यांच कुटुंब एकच आहे. आ. रोहित पवार हे गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे वेगळीच चर्चा आहे. त्यांनी खुशाल या जिल्ह्यात यावे, त्यांनी माझ्याच घरी थांबावे. भलेही ते बाहेर जावून माझ्या विरोधात बोलले तरी मला चालले, याला माझी कसलीही हरकत नसणार असे खा. पटेल म्हणाले.सोबतच जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल जी चर्चा सुरु आहे,त्यावर बोलतांना त्यांचे आमच्या पक्षात स्वागत आहे.त्यांनी नक्की यावे.परंतु ते सुध्दा प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या मनात काय हे सांगता येणार नसल्याचे म्हणाले.
मेळाव्याला खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, रविकांत बोपचे, पुरुषोत्तम पांडे, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, रफीक खान, प्रभाकर दोनोडे, डॉ अविनाश जायस्वाल, हुकूमचंद अग्रवाल, गणेश बरडे, योगेंद्र भगत, अजय गौर, मनोज डोंगरे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, यशवंत परशुरामकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, नेहा तुरकर, जगदीश बावनथडे, किरण पारधी, सुधा राहंगडाले, मोहन पटले, प्रेमकुमार राहंगडाले, केवल बघेले, लोकपाल गहाने, अविनाश काशिवार, अजय उमाटे, नीरज उपवंशी, अशोक शहारे, सतीश देशमुख, किशोर तरोणे, अजय लांजेवार, सुशीला भालेराव, माधुरी नासरे, जिब्राइल पठान, रजनी गिरहपुंजे, ममता बैश, पारबता चांदेवार, रजनी गौतम, जया धावड़े, कल्पना बाहेकर, सिमा शेंडे, सुशीला हलमारे, दुर्गा तिराले, अखिलेश सेठ, सचीन शेंडे, सुनील भालेराव, हेमंत पंधरे, विजय रगडे, विनीत सहारे, नानू मुदलियार, मालती राजेश कापसे, वेनेश्वर पंचबुद्धे, जुनेद शेख, शंकरलाल टेम्भरे, राजेश जमरे, शिवलाल जमरे, सरला चिखलोंडे, नरेश कुंभारे, विजय बन्सोड, रुकीराम वाढई, शिवाजी गहाणे, टीकाराम मेंढे, दानिश साखरे, जितेंद्र चौधरी, भगत ठाकरानी, लक्ष्मीकांत रोचवानी, विजय बिंझाडे, रिताताई पटले, प्रशांत दहाटे, जगदीश कटरे, नितीन लारोकर, सलीम जव्हेरी, राहुल गहेरवार, संदीप मेश्राम, ओमप्रकाश येरपुडे, नागेश तरारे, मनोहर तरारे, भोजराज धामेचा, विजय बुरांडे, प्रभू असाटी, सुनील पटले, शैलेश वासनिक सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते.