प्रफुल्ल पटेल गटाला धक्का
देवरी, दि.०३ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (शरद पवार गट) तालुका कार्यकारिणी तावुकाध्यक्ष विलास चाकाटे यांनी काल गुरूवारी (दि.०२) स्थानिक धुकेश्वरी मंदिरात जाहीर केली. यावेळी झालेल्या बैठकीत पक्षाची विचारधारा सर्वदूर पोचविण्याचा संकल्प करीत अनेक कार्यकार्यकरत्यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत शरद पवार गटात सामील झाले.
देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवरी तालुकाध्यक्ष विलास चाकाटे यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा कालच्या सभेत केली. यावेळी गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जुळा, जिल्हा महासचिव बिसराम सलामे, जिल्हा सचिव महेंद्र निकोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या मंजुषाताई वासनिक, ईशिका उके यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरी तालुका कार्यकारिणी घोषीत केली.
यामध्ये देवरी तालुकाध्यक्ष पदी -विलास पंढरी चाकाटे, तालुका महिला अध्यक्ष – आरती जागळे, तालुका युवक अध्यक्ष – अरुण आचले, उपाध्यक्ष – रुपेशकुमार राऊत, तालुका महासचिव – विनोद रोकडे, झुलनबाई नागपुरे, कोषाध्यक्ष – कैलास मरस्कोले, जिल्हा परिषद प्रमुख – दुर्गेश शेंडे, प्रशांत देसाई, देवेंद्र शहारे, ईश्वर मेश्राम, किरण चौधरी, सदस्य पदी प्रल्हाद चौधरी, सलमा पठाण, रशिदा बंदेअली, रिमुताई निकोडे, मुक्ता सलामे आदीची निवड करण्यात आली. रजु तवाडे, वंदना गावळ, देवकाबाई पिहदे, छाया मडावी, या शेकडो कार्यकर्त्यानीं पक्षात प्रवेश केला.
विलाश चाकाटे हयांनी बोलतानां सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशान्वये प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिह परिहार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन माझी देवरी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मुळातच अजित पवार गटातील सक्रिय कार्यकर्ते आमच्या पक्षात सहभागी झाले तर काही कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेण्यात इच्छुक आहेत, त्यांचे स्वागत करतो. देवरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी भर देणार असल्याचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे यांनी सांगितले आहे.
अजित पवार – प्रफुल्ल पटेल गटाला धसका
महाराष्ट्रात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारे विरुद्ध अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी आपला वेगळा गट निर्माण करून भाजपाशी जवळीक करुन त्यांच्या विचार धारेशी जुळून सत्ता स्थापना केली. त्यामुळे देवरी तालुक्यात मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाला जुळत नवीन कार्यकारिणी करुन देवरी तालुक्यातील अजित पवार – प्रफुल पटेल देवरी गटाच्या नेत्यांना चांगलाच धसका दिला आहे.