अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काल पंचनामे करा – जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड

0
25

#नुकसान भरपाई संबंधी तहसीलदारांना कॉंग्रेसचे निवेदन

#धानाचे पुंजने सुद्धा नुकसान भरपाईत समावेश करा

सालेकसा-कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड आज आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात तालुका निहाय दौर्यावर होते. दरम्यान सालेकसा तालुक्यातील कॉंग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सध्या तालुक्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत जाब विचारण्यास सांगितले असता पदयात्रा काढत तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांना कॉंग्रेस पदाधिकारी यांनी निवेदन सुपूर्द करत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नुकसान भरपाई बाबत सकारात्मक राहून निर्णय घेण्याचे निवेदन दिले. या निवेदनात सर्वप्रथम केवळ ई-पिक पाहणी अप्लिकेशनच्या माध्यमाने आलेल्या नोंदी ग्राह्य न धरता मौकाचौकाशी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. सालेकसा तालुका हा नक्षल आणि दुर्गम असल्याने या भागातील शेतकरी डिजिटल साक्षरतेपासून कोसो दूर असल्याने अजूनही शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी बाबत योग्य माहिती नाही. त्यामुळे तालुक्यातून केवळ ३१० शेतकऱ्यांनी अद्याप नुकसानीचे नोंद केली आहे. एवढ्या मोठ्या तालुक्यात केवळ ३१० शेतकऱ्यांचे नुकसान झाले हि बाब काही शक्य नाही त्यामुळे मौकाचौकशी करूनच पंचनामे तयार करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली.

          याशिवाय शासनाने धानाचे पुंजने जमा झाल्यास ते नुकसान भरपाई पासून वगळण्याचे निर्णय घेतले असल्याने पावसात पुंजने भिजून धान अंकुरित झाल्याने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई पासून वंचित राहणार होते. याकरिता तालुका अध्यक्ष राजु दोनोडे यांनी धानाचे पुंजने जरी पावसात भिजले असले तरी ते नुकसान भरपाई करिता पात्र समजण्यात यावे अशी मागणी उचलून धरली. उभे पिक, धानाचे करपा, पुंजने या सर्व बाबींचे नुकसान झालेले आहे त्यामुळे नुकसान भरपाई करिता असे तफावत न करता मौकाचौकशी शिवाय नुकसानीचे अहवाल तयार करणे अयोग्य आहे असे सुद्धा मत तालुका अध्यक्ष राजु दोनोडे यांनी व्यक्त केले.

          निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड यांच्यासह आमगाव देवरी विधानसभा समन्वयक गजानन झंझाड, सालेकसा तालुका अध्यक्ष राजु दोनोडे, आमगाव तालुका अध्यक्ष संजय बहेकार, तालुका महासचिव ओमप्रकाश ठाकरे, तीरखेडी जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, गट नेते जितेंद्र बल्हारे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष विजय फुंडे, युवा कॉंग्रेस जिल्हा महासचिव ओमप्रकाश लिल्हारे, तालुका सचिव शैलेश बहेकार, विधानसभा प्रसिद्धी प्रमुख राहुल हटवार,  युवा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नितेश (लाला) शिवणकर, तालुका प्रवक्ता लखन अग्रवाल,  जेष्ठ कार्यकर्ते यादनलाल बनोठे, जागेश्वर नागपुरे, राजेश अडमे, भारत लिल्हारे, गेंदलाल चौधरी, बंटी कटरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख रोहित बनोठे, कॉंग्रेस व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष आशुतोष असाटी, मंगेश चुटे तालुक्यातील बूथ प्रमुख, ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर कॉंग्रेस पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.