नागपूर,दि.08- नबाब मलिक यांचे जर दाऊद सोबत संबंध असतील,तर खासदार प्रफुल्ल पटेल यांचे देखील दाऊद सोबत संबंध असल्याचे सिद्ध झालेले असून ईडीने यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.उपमुख्यमंत्री यांच्या नवाब मलिक ह्यांच्याबाबत जशा तीव्र भावना आहेत तशाच दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल ह्यांच्याबाबतही आहेत का ? अशी विचारणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नबाब मलिंक हे अजित पवार यांच्या गटात असल्याने सत्ताधारी भाजपच्या शेजारी असलेल्या बाकावर बसल्याने भाजपची मात्र चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नबाब मलिक यांना सत्ताधारी बाकावर भाजपच्या शेजारी बसू देण्यास मनाई करणारे पत्र लिहिल्याने चांगलाच “कलगीतुरा” रंगल्याचे दिसून येत होते.