Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसचा आज स्थापना दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज स्थापना दिवस

0

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसप्रसंती शुक्रवार (दि.१0) सकाळी १0 वाजता आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे ध्वजारोहण करण्यात येईल.
अध्यक्षस्थानी जिल्हा राकाँ अध्यक्ष विनोद हरिणखेडे राहतील. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व घटकांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर परिषद सदस्य, नगर पंचायतचे सदस्य, जिल्हा परिषदेदचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी सेवा दल काँग्रेस, ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) सेल, मागासवर्गीय सेल व सर्व घटक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष शिव शर्मा, जिल्हा महासचिव राजकुमार एन. जैन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Exit mobile version