Home राजकीय वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवईंचा बळवंत वानखडेंना जाहीर पाठिंबा

वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवईंचा बळवंत वानखडेंना जाहीर पाठिंबा

0

अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati LokSabha) निवडणुक आता चांगलीच रंगतदार वळणावर आलेली आहे. वंचितच्या जिल्हाध्यक्षाने आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेने अनेक दिग्गजांच्या झोपा उडाल्या आहे. (Vanchit Bahujan Aghadi) वंचितच्या जिल्हाध्यक्षाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात वंचित मध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे.

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीसोबत युती न केल्यामुळे याठिकाणी वंचित ने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर आंबेडकर यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुले बौद्ध समाज कमालीचा नाराज झाला होता. बौद्ध समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी यासंदर्भात अनेकांना धारेवर धरत बळवंत वानखडे यांच्या पाठीशी राहण्यासाठी प्रयत्न केले. परंतु वंचित ने आपला पाठींबा बळवंत वानखडे यांना न दिल्यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई (Prof. Shailesh Gavai) यांनी एकंदरीत परिस्थीतीचा आढावा पक्षश्रेष्ठीकडे सादर केला होता. परंतु पक्षश्रेष्ठीने याची दखल न घेतल्यामुळे अखेर बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला असल्याचे प्रा. शैलेश गवई यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. उल्लेखनीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. अश्यातच जिल्हाध्यक्ष शैलेश गवई(Prof. Shailesh Gavai)  यांनी बळवंत वानखडे यांना वंचित चा पाठिंबा देऊन जिल्ह्यात खळबळ उडवून दिली. समाजाचा वाढता दबाव व निवडून येणाऱ्या प्रामाणिक उमेदवारासाठी हा निर्णय घेतला असल्याचे गवई म्हणाले. या सर्व पाठिंब्यामुळे बळवंत वानखडे यांची उमेदवारी भक्कम झाली एवढे मात्र निश्चित.

जनभावना बळवंत वानखडे यांच्या पाठीशी
या पाठिंब्यामागे अनेक कारणांची किनार आहे. आनंदराज आंबेडकर यांचे पदाधिकारी (Vanchit Bahujan Aghadi) वंचितच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान देत नव्हते. विश्वासात घेत नव्हते तसेच निवडून येणाऱ्या उमेदवारासोबत आपण असलो पाहिजे, अश्या जनभावना जिल्ह्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेत जनभावना असलेले समाजाचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिल्याचे प्रा. शैलेश गवई (Prof. Shailesh Gavai) यांनी सांगितले.

Exit mobile version