Home राजकीय जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा शिंदे गटाला रामराम!

जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा शिंदे गटाला रामराम!

0
12

सध्या लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे ला पार पडणार आहे. आता या टप्प्यात सर्व राज्यच लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदार संघाकडे लागले आहे. मात्र अशातच आता या ठिकाणी मतदान होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण-मुरबाडचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद मोरे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. अरविंद मोरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेत व्यासपीठावर स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज होते त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे अशी चुरशी लढत होणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याणमधील जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे. परंतु मतदानापूर्वी अरविंद मोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बडानंतर उद्धव ठाकरे गटाकडे असलेले अरविंद मोरे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. अरविंद मोरे हे कल्याण परिसरात चांगलेच लोकप्रिय आणि सक्रीय असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येक कार्यक्रमात ते आघाडीवर असतात.

अरविंद मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. परंतु कल्याण लोकसभा मतदार संघाचे मतदान दोन, तीन दिवसांवर आले असताना अरविंद मोरे यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.