जिल्हा काँग्रेस विधी सेल अध्यक्ष पदी अँड.टी.बी. कटरे

0
176

गोंदिया,दि.२४- जिल्हा काँग्रेस विधी सेलच्या अध्यक्ष पदाकरिता एड टी. बी. कटरे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश विधी सेलचे अध्यक्ष एड. रवीप्रकाश जाधव यांनी केली आहे.त्यांच्या नियुक्तीवर गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बंसोड ,आमदार सहेसराम कोरोटे, प्रदेश सचिव पी.जी. कटरे ,प्रदेश प्रतिनिधी राजू पालीवाल,जिल्हा किसान सेल अध्यक्ष जितेश राणे ,युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा बागडे, महिला अध्यक्ष वंदनाताई काळे,जिल्हा सहकार अध्यक्ष राधेलाल पटले ,तालुका काँग्रेस अध्यक्ष मधुसूदन दोनोडे,जगदीश एरोला,संजय बहेकार,डुमेश चौरागडे,एड. हरिणखेडे,संकेश तिवारी,ईशुलाल भालेकर व्हि.एम.चौरे,दामोदर नेवारे,रोशन बडोले,नेहा सरगम,स्नेहा कोल्हे व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी अड. कटरे यांनी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आणि जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करून पुढील कार्य करण्यासाठी युवक ,महिला ,शेतकरी, कष्टकरी लोकांच्या हितासाठी न्याय मिळवण्याकरिता लढा देणार असून पक्ष बळकतीकरिता सदैव प्रयत्नशील राहील असे मत व्यक्त केले.