
अर्जुनी मोर. -भारतिय जनता पार्टी व्यापारी आघाडी तालुका अर्जुनी मोरगाव च्या उपाध्यक्ष पदी संतोषकुमार राठी यांची नियुक्ती करण्यात आली.
अर्जुनी मोर. तालुक्यातील गोठणगाव येथे 23 जुलै रोजी आयोजीत एका छोटेखानी समारंभात भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते राठी यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते,पं.स.उपसभापती होमराज पुस्तोळे,तालुका महामंत्री लैलेश शिवनकर,राजहंस ढोक,मिथुन टेंभुर्णे,तेजराम डोंगरवार, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गोठणगाव क्षेत्रातील विवीध समस्या व अडचणीची माहीती घेतली.तसेच पुरपरीस्थीतीवर ही चर्चा केली.तसेच पक्षसंघटन बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.