
गोंदिया,25 जुलै-महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवून प्रथमच गोंदियात आलेले डॉ.परिणय फुके यांचे गोंदियातील जनतेने मोकळ्या मनाने स्वागत केले.फुलचूर नाका येथे फटाके, ढोल वाजवून आणि भगवा फडकवून स्वागत केले.
डॉ.परिणय फुके यांचे कुडवा येथील विशाल लॉनमध्ये भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, आमगाव, देवरी, गोरेगाव, तिरोडा या तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही उपस्थिती नोंदवून आमदार डॉ.परिणय फुके यांचे स्वागत केले.या सत्कार समारंभात आमदार फुके यांनी गोंदियातील जनतेची व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन सर्वांचे प्रेम व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले, आपल्याकड़े मिळाली आपुलकी हिच आमची खरी ऊर्जा आहे. ही ऊर्जा यापुढेही टिकवायची आहे. गोंदियातील जनतेमध्ये आज आपण जे प्रेम पाहतो त्यावरून गोंदिया जिल्ह्यातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता उत्साही असल्याचे दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकण्यासाठी आपण दृढनिश्चय करून सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
भाजप जिलाध्यक्ष येसुलाल उपराडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, संगठन मंत्री वीरेन्द्र (बालाभाऊ) अंजनकर, पूर्व विधायक हेमंत पटले,भेरसिंग नागपुरे, नेतराम कटरे,विजय शिवनकर, रचनाताई गहाने, दिनेश दादरीवाल,संजय टेंभरे, संजीव कुलकर्णी, जयंत शुक्ला, तुमेश्वरी बघेले, धनलाल ठाकरे, अमित झा, माधुरी रहांगडाले, ओम कटरे, संतोष चौहान, डॉ. प्रशांत कटरे,गजेन्द्र फुंडे, कुणाल बिसेन, भावनाताई कदम, नंदुभाऊ बिसेन, शंभुशरणसिंह ठाकुर, लायकराम भेंडारकर यांच्यासह सर्व भाजप जिल्हा, शहर व तालुका आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.