गोंदिया,दि.०२ःनवमतदार नोंदणी कार्यक्रम व आगामी होउ घातलेल्या विधानसभा निवडणुक लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा बैठक युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवानीताई दाणी यांच्या प्रमुख उपस्थितित शासकीय विश्राम गृह गोंदिया येथे पार पडली. सदर बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी नवमतदार नोंदणी साठी बूथ पातळी वर प्रत्यक्ष जाऊन त्या बूथवरील प्रत्येक नवमतदाराची नोंदणी करावी अशी सुचना शिवानी ताईनी दिली. तसेच एवढ्या पावसात मोठ्या संख्यने युवा मोर्चा पदाधिकारी बैठकित उपस्थित असल्याने ओम कटरे यांनी त्यांचे अभिनन्दन केले. अशाच जोमाने नवमतदार नोंदणी कार्यक्रम संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पाडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी वरिष्ठना दिली. तसेच युवा मोर्चा पदाधिकारी यांनी लोकसभेत झालेल्या चुकाना दुरुस्त करून विधानसभा निवड़णुकि करिता ताकदीने कामाला लागण्याची सुचना दिली.यावेळी विरेंद्र अंजनकर भंडारा-गोंदिया समन्वयक,जिल्हाध्यक्ष येसूलाल उपराडे यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत युवा मोर्चा जिल्हा महामंत्री इंद्रजित भाटिया,हर्ष मोदी आदित्य शर्मा , विद्यार्थी विभाग प्रमुख पारस पुरोहित,सर्व तालुका अध्यक्ष व मोठ्या संख्येने युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.