गोंदिया,दि.13 : पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम.
15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून पोलीस मुख्यालय मैदान कडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता पोलीस मुख्यालय मैदान गोंदिया येथे आगमन. सकाळी 9 वाजता झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालय मैदान गोंदिया येथून बिरसी विमानतळ गोंदियाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.