13 ला भाजपचे कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलन गोंदियात..

0
827

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, परिणय फुके यांच्यासह महायुतीचे नेते राहणार उपस्थित..

गोंदिया. 11 ऑक्टोबर
आमदार विनोद अग्रवाल यांना त्यांच्या सरकारकडून मिळालेल्या भरघोस निधीतून सलग पाच वर्षे केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी 13 ऑक्टोबर रोजी कर्तव्यपूर्ती जनआशीर्वाद महासंमेलनाचे आयोजन, सकाळी 11 वाजता टीबी टोळीच्या विशाल मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

या कर्तव्यपूर्ति जनआशीर्वाद महासंमेलनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ.परिणय फुके यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहुन संबोधित करणार.

जनआशीर्वाद महासंमेलनाच्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा, तहसील व ग्रामीण घटकांनी केले आहे.