अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादीने ऐनवेळी धोका दिल्याने डाॅ.सुगत चंद्रिकापुरे मैदानात

0
90

अर्जुनी मोर. विधानसभेत तिरंगी लढत
अर्जुनी मोर —अर्जुनी मोर. विधानसभेची यावर्षीची निवडणुक विवीध कारणांनी गाजली.कुणी पक्षांतर करुन उमेदवारी मिळविली तर कुणाची पक्षांनी उमेदवारी नाकारली,तर कुणाला पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने बंडखोरी करुन अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला.अशातच अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना ऐनवेळी धोका देवुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपले सुपुत्र डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांना प्रहार जनशक्ती च्या बॅनरखाली निवडणुकीच्या मैदानात उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे.
अर्जुनी मोरगाव विधासभा क्षेत्रात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामधे महाविकास आघाडीतुन काॅग्रेस चे दिलीप बन्सोड,महायुती मधुन ईंजी.राजकुमार बडोले तथा प्रहार जनशक्तीचे स्वतंत्र उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांचे मधे तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची निवडणुकीच्या ऐन तोंडावर उमेदवारी डावलून त्यांचे पाठीत खंजीर खुपसुन राष्ट्रवादी चे अजीत पवार व प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा विश्वासघात केला. असा चंद्रिकापुरे यांचा आरोप आहे.हे भांडवलदार कसा आपल्या निष्ठावान माणसांचा ऐनवेळी घात करतात हे सांगण्याचा प्रयत्न आमदार मनोहर चंद्रिकापुरे व उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे हे आपल्या प्रचार दौऱ्यात सांगतात.
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची ऐनवेळी उमेदवारी कापण्यात आल्याने त्यांनी आपले सुपुत्र डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवीले आहे.आपल्या आमदार वडिलांकडून सामाजीक व राजकीय धडे घेतलेले डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी संपुर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात *हक्काचा माणुस* म्हणुन प्रसिद्धी मिळवून तरुण उत्साही मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.या विधानसभेत येणा-या अर्जुनी मोर, गोरेगाव, व सडक/ अर्जुनी तालुक्यातील गावांगावात प्रचार सभा व रॅल्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसुन येत आहे.न भुतो न भविष्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेली रॅली व प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चुभाऊ कडु यांचा रोड शो मतदारांच्या मनात घर करुन गेला.येत्या दोन दिवसानंतर प्रचाराला वेग येणार असुन आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या दमदार प्रचार सभा होणार असल्याची माहीती मिळाली आहे.