Home राजकीय माणिकराव ठाकरे उपसभापती पदी बिनविरोध

माणिकराव ठाकरे उपसभापती पदी बिनविरोध

0

मुबंई,दि.5-महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची आज विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून बिन विरोध निवड झाली, माणिकराव ठाकरे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आहेत,पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माणिकराव ठाकरे यांना मोठी जवाबदारी मिळाली आहे, माणिकराव ठाकरे दोन वेळा राज्याचे गृहराज्य मंत्री होते तर २००८ पासून २०१५ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष होते, काही काळ त्यांच्याकडे उर्जा विभागही होता. हायकमांडच्या जवळच्या गटातील असलेले माणिकराव ठाकरे यांचे दिल्लीत चांगले वजन आहे, मात्र त्यांच्या नेतृत्वात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसचे पाणीपत झाल्या नंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. यवतमाळ जिह्यातील दारव्हा तालुक्यातील माणिकराव ठाकरे बिनविरोध उपसभापती झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version