
सालेकसा– राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे सालेकसा तालुका शिवसेना (शिंदे गट) अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून डॉ हिरालाल साठवणे, जिल्हा समन्वयक शिवसेना, श्री बाजीराव तरोणे ओबीसी आघाडी शिवसेना, श्री किसन रहांगडाले तालुका संयोजक शिवसेना, श्री सुरेश कुंभरे अध्यक्ष संघर्ष वाहन चालक, श्री झनकसिंग नागपुरे संघटक वाहतूक संघटना, श्री सोनू दसरीया विभाग प्रमुख शिवसेना यांचा अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या व सालेकसा तालुक्यात पक्ष संघटन मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, डॉ अजय उमाटे, बृजभूषण बैस, राजू एन जैन, नानू मुदलियार, केतन तुरकर, सोमेश रहांगडाले, पदमलाल चौरीवार, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर सह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.