खासदार प्रफुल पटेल 23 मे रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर

0
24

गोंदिया,दि.२३ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात विदर्भस्तरीय मेळावा, परवाना भवन, ऑडिटोरियम हॉल, तिसरा माळा , कस्तुरचंद पार्क जवळ, नागपूर, येथे आज दि.२३ मे २०२५ शुक्रवारला सकाळी ११ ते साय. ०५.०० वाजता पर्यंत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला प्रामुख्याने राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक,आ.धर्मरावबाबा आत्राम,आ.राजकुमार बडोले,आ.राजूभाऊ कारेमोरे,आ.सुलभा खोडके, आ.अमोल मिटकरी,आ.मनोज कायंदे,आ.संजय खोडके,राजेंद्र जैन मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.०० वाजता सुनील बाबुराव फुंडे यांचा निवास स्थान, पिंपळगाव/ सडक, लाखनी, जिल्हा भंडारा येथे सांत्वना भेट, सायंकाळी ०७.०० वाजता जगदीश येरोला यांचा निवास स्थान, जैन रिसॉर्ट कॉलोनी, गोरेगांव, जिल्हा गोंदिया येथे सांत्वना भेट, सायंकाळी ०७.३० वाजता आशीर्वाद समारोह चि. हितेश संग सौ. का. निकिता यांचा आशीर्वाद समारोह मध्ये उपस्थिती केवलभाऊ बघेले यांचा निवास स्थान, भुताईटोला, पाथरी, त गोरेगांव, रात्री ०८.३० वाजता चि. अनुज जयस्वाल संग सौ. का. अक्षदा शिवहरे यांचा विवाह समारोह मध्ये उपस्थिती जलाराम लॉन, गोंदिया येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.