
विदर्भस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांची ग्वाही
नागपूर,दि.२४ः-आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी कार्य करा, कुठलीही मदत लागल्यास पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुम्ही पक्षाचा विचार केल्या तर पक्ष देखिल तुमच्याकडे लक्ष ठेवणार असल्याची हमी खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात क्रियाशील सभासदांची नोंदणी किती केली याची आकडेवारी आपल्याकडे आहे. प्रत्येकाने पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष, प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी जिल्हानिहाय संवाद साधला. दरम्यान पक्षासाठी काम करतांना येणाऱ्या अडचणीबद्दल जाणून घेत समस्या सोडविण्याची हमी श्री. पटेल यांनी दिली. मेळाव्याला असलेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच पक्षाला बळकटी देणार आहे. यावेळी विदर्भातील जिल्हा निहाय्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रत्येक जिल्हयातील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत च्या निवडणूक होऊ घातल्या असल्याने कार्यकर्त्यांसोबत आगामी निवडणुकांच्या संबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेच्या समस्या व अडी अडचणी समजून घ्या, जेणे करून सामान्य माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनमानसाचा आहे यांची जाणीव झाली पाहिजे. सभासद नोंदणी अभियान त्वरित राबविणे, जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडून संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.
नागपूरातील परवाना भवन येथे आयोजित विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात प्रामुख्याने माजीमंत्री धर्मबाबा अत्राम, आमदार संजयभाऊ खोडके, आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोज कायंदे, मा. आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस नागपुरचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने परवाना भवन, नागपूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खासदार प्रफुल पटेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भातील जिल्हा निहाय्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रत्येक जिल्हयातील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत च्या निवडणूक होऊ घातल्या असल्याने कार्यकर्त्यांसोबत आगामी निवडणुकांच्या संबंधाने सविस्तर चर्चा खा. प्रफुल पटेल यांनी केली.