महिला राष्ट्रवादी कांँग्रेसचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकाना निवेदन

0
20

गोंदिया दि. १९ :: जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. महिलांवर होणारे अत्याचार, सामाजिक क्षेत्रात असुरक्षेची भावना, वाढते अतिप्रसंग, विद्यार्थिनींची छेड या बाबी सामाजिक दृष्टीने चिंतेचे विषय असून त्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच महिलांची सुविधा लक्षात घेऊन केंद्रशासनाने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजनेत अनेक त्रुट्या आहेत.देण्यात आलेल्या बीपीएल यादीत अनेक त्रुट्या समोर आल्या आहेत. त्या दुरूस्त करण्यात यावे, इंदिरा आवास योजनेमध्ये घरकुलांची गरज असलेल्यांची नावे समाविष्ट करण्यात यावी, शहरात स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे, मोकाट जनावरे व बाधित होणारी रहदारी सुरळीत करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. शिवाय शहरात अनेक ठिकाणी डुकरांचा हैदोस वाढला असून सबंधितांनी त्याकडे लक्ष द्यावे, निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सुशीला भालेराव, जि.प.सदस्य दुर्गा तिराले, शहर अध्यक्ष आशा पाटील, तिरोडा पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य रजनी गौतम, ललीता चौरागडे, प्रिती रामटेके, खुशबू टेंभरे, जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष लता रहांगडाले, सुनिता मडावी, राखी ठाकरे, कविता रहांगडाले, पार्वता चांदेवार, उर्मिला रहमतकर, सिमा पटले, निर्मला ईश्‍वर, न.प.सभापती माया निर्वाण, पं.स.सदस्य सुशीला हलमारे, कुंदा दोनोडे, कुंदा चंद्रिकापुरे, माया पटले, रंजू अगडे, माया शरणागत, सुरेखा राऊत, विशाखा लोथे, पुष्पा डोंगरवार, सरिता नंदेश्‍वर, विशाखा रामटेके व इतर महिला उपस्थित होत्या.