Home राजकीय भाजपचे ९ बंडखोर उमेदवार सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित

भाजपचे ९ बंडखोर उमेदवार सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित

0

गडचिरोली, दि..१०: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या ९ प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
खा.अशोक नेते यांनी सांगितले की, चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू चिळंगे, येवली येथील भाजपच्या सदस्य लक्ष्मी कलंत्री, देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रीती शंभरकर, गोवर्धन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कौशिक, नंदू नरोटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य डॉ.तामदेव दुधबळे, संध्या दुधबळे, तसेच विलास बल्लमवार यांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांच्या बंडखोरीचा भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर कुठलाही परिणाम होणार नाही. उलट कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, अधिकृत उमेदवारच बहुमतांनी विजयी होतील, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला.

Exit mobile version