Home राजकीय नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही – पृथ्वीराज चव्हाण

नारायण राणेंना काँग्रेसची संस्कृती समजलीच नाही – पृथ्वीराज चव्हाण

0

अकोला,दि.24 : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी महाराष्ट्रात येण्याआधीपासून आहे ते जाणार, असे आम्हीही ऐकत आहोत;  अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे यांच्या निवासस्थानी रविवारी त्यांनी पत्रकारांशी हा संवाद साधला. पुसद येथील पुस्तक प्रकाशनानिमित्त जाण्यासाठी चव्हाण विदर्भ एक्स्प्रेसने अकोल्यात आले होते.
तूर उत्पादनाचे अंदाज वारंवार बदलून राज्य सरकारने सट्टाबाजार गरम केला आहे. भाजपचे सटोडियांशी संगनमत असल्याचा आरोप करीत पृथ्वीराज चव्हाण यांनी तुरीच्या आकडेवारीचा गोंधळ पत्रकारांसमोर मांडला. काँग्रेसने आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांकडून चौकशी लावली. तीदेखील अधिकार नसल्याने फसवी ठरत आहे.आम्ही आमच्या कार्यकाळात शेतक-यांसाठी ऐतिहासिक अशी कर्जमाफी केली. शेतकºयांकडून कोणताही अर्ज भरून न घेता कर्जमाफीचा लाभ दिला. भाजपा सरकारने कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शेतक-यांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले. ८९ लाख शेतकरी कर्जबाजारी आहेत, असे सरकारने सांगितले होते. आता कर्जमाफीसाठी ५८ लाख शेतक-यांचे अर्ज झाल्याने उर्वरीत शेतकरी गेले कुठे, ८९ लाखाचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला. ८९ लाख शेतक-यांसाठी ३४ हजार कोटींची तरतूद केल्याचे सरकार सांगत आहे. ३४ हजार कोटींची तयारी केली असेल तर दीड लाख रुपयांऐवजी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. भाजपा सरकारने बळीराजांचा घोर अपमान चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version