Home राजकीय पांजरा (काटे) येथे सरपंचासह सात सदस्य बिनविरोध

पांजरा (काटे) येथे सरपंचासह सात सदस्य बिनविरोध

0

माजी मंत्री अनिल देशमुख गटाचे वर्चस्व
नागपूर,दि.07-  राज्याची  उपराजधानी असलेल्या नागपुर  जिल्हयातील काटोल विधानसभा मतदारांमधून थेट  अविरोध सरपंच  होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पांजरा (काटे)ग्रामपंचायतीच्या सौ.विजुताई युवराज सरवरे यांना मिळाला आहे. तसेच  ग्रा.प. सदस्य पदाचे उमेदवार संजय पुंजाराम सावरकर, राजेंद्र पुंड़लिक चरडे, अमोल वसंता वाघाडे,  सौ.वर्षा विनोद भलावी, सौ.कविता अनिल सरोदे,सौ.लता पांडूरंग धर्मे, सौ.भारती देविदास मुंगभाते  यांचे उमेद्वारी होती. परंतु यांचे विरोधात उमेदवारी अर्ज न आल्याने  सरपंचा सह सातही उमेदवार हे अविरोध ग्रा.प.सदस्य निर्वाचित झाले आहेत.पांजरा काटे येथील बिनविरोध निवडलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा.भास्कर पराड , चंद्रशेखर चिखले, जयंत टालाटुले, ज्ञानेश्वर  कोचे, विश्वनाथ चंदनखेडे, पुंजाराम सावरकर, मानकर गुरूजी, शालिक इखार, प्रदीप केवटे, मनोहर सरोदे, रायुका तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, रा वि का जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजभिये आदी उपस्थित होते.

Exit mobile version