Home राजकीय निरंजन डावखरेंचा दानवे- फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

निरंजन डावखरेंचा दानवे- फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0

मुंबई,दि.24- कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी सकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे- पाटील यांच्या उपस्थितीत डावखरे यांनी कमळ हातात घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली व राष्ट्रीय पक्षात काम करण्याची इच्छा असल्याने भाजपात दाखल झाल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमुळे नव्हे तर स्थानिक नेत्यांच्या एकतर्फी कारभाराला कंटाळलो होतो असेही त्यांनी सांगितले. निरंजन मागील काही दिवसापासून सातत्याने संपर्कात होता असे फडणवीस यांनी सांगितले तर निरंजनला कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिली जाईल असे रावसाहेब दानवे-पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version