Home Top News पाच अपक्ष आमदार आठवड्याभरात भाजपात -रावसाहेब दानवेंचा दावा

पाच अपक्ष आमदार आठवड्याभरात भाजपात -रावसाहेब दानवेंचा दावा

0

वाशिम : भाजपात येत्या आठवड्याभरात पाच अपक्ष आमदार प्रवेश करतील, असे सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. तसेच काँग्रेसचे 20 माजी आमदारही टप्प्याटप्यानं भाजपच्या गोटात येतील, असंही दानवे म्हणाले आहेत. ते वाशिममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेआधीच्या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्याचे मनसेध्यक्ष राजू पाटील हे सुद्धा भाजपात दाखल झाले. शिवाय मनसेचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सभापती यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यासाठी रावसाहेब दानवे वाशिम येथे आले होते.दरम्यान, पुढच्या काळात विदर्भातील मनसेला आणखी मोठे खिंडार पडण्याची चिन्हे असून अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या युती होणार, हे मी आधीच स्पष्ट केलं होतं. पण वरच्या पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर युती करावयाची की नाही याचे अधिकार स्थानिक पदाधिकार्‍यांकडे आहेत. युतीमध्ये स्थानिक पातळीवर योग्य जागावाटप होतं काय, यावरही या युतीचे भवितव्य अवलंबून राहील, असं दानवे म्हणाले.

Exit mobile version