Home राजकीय ‘मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा’, प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

‘मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा’, प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

0

सोलापूर,दि.19 – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागासवर्गीयांना काय दिले?. मोदी हे 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तर 5 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, मागासवर्गींयांना काय मिळाल? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच मोदींना शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. मोदींनी माढ्यातील सभेत ओबीसी असल्याचे म्हटले होते, त्यावरुन आंबेडकरांनी दाखला दाखविण्याचे आवाहन केले आहे.

प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  माढ्यातील सभेत बोलताना, मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्याचं मोदींनी म्हटले होते. पण, आता काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणत असून मी ते सहन करणार नाही, असे म्हणत माढ्यातील सभेत मोदींनी ओबीसी कार्ड वापरले होते. तसेच, येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला होता.

Exit mobile version