Home राजकीय चुरु लोकसभा क्षेत्राचे निरिक्षक वराडेंची राहुल गांधीशी चर्चा

चुरु लोकसभा क्षेत्राचे निरिक्षक वराडेंची राहुल गांधीशी चर्चा

0

गोंदिया,दि.02ः- 17 व्या लोकसभेकरीता सध्या निवडणुका सुरु असून पाचव्या टप्यात होऊ घातलेल्या राजस्थान राज्यातील चुरु लोकसभा मतदारसंघाचे निरिक्षक म्हणून गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वराडे हे तिथे ठाण मांडून आहेत.दरम्यान चुरू लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्याप्रचाराकरीता सरदार शहरात आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीची माहिती निरिक्षक वराडे यांनी देत चर्चा केली.यावेळी राजस्थानातील स्थानिक काँग्रेस नेत्यांसह वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.

Exit mobile version