Home राजकीय अर्जुनी/मोर तालुका शिवसेना प्रमुखपदी अजय पालीवाल यांची नियुक्ता

अर्जुनी/मोर तालुका शिवसेना प्रमुखपदी अजय पालीवाल यांची नियुक्ता

0

अर्जुनी मोरगाव, दि. ०७ : : शिवसेना तालुका प्रमुखपदी स्थानिक अजय पालीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध पदाधिकाNयांचीही निवड करण्यात आली आहे. तर तालुका शिवसेनेमधून निघालेले विजय खुणे यांची त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत घरवापसी करण्यात आली.शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक १ जुलै रोजी गोंदिया येथील शिवसेना कार्यालयात घेण्यात आली. सभेला गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे, उपजिल्हा प्रमुख शेलेश जायस्वाल, संजय पवार अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यासभेमध्ये अजय पालीवाल यांची अर्जुनी मोरगाव तालुका शिवसेना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अरूण मांडवगणे यांची शिवसेना उपजिल्हा संघटनपदी तसेच सुरेश ठवरे (अरतोंडी) यांची शिव-भिमसेना तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यापुर्वी २८ जून रोजी नवेगावबांध विश्रामगृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात शिवसेना संपर्वâ प्रमुख बाळाभाऊ परब यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुक्यातील विजय खुणे हे काही काळासाठी शिवसेनेतून बरखास्त झाले होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे एका आदेशान्वये बाळाभाऊ परब यांचे मार्गदर्शनात विजय खुणे यांची शिवसेनेत घरवापसी करण्यात आली. यावेळी रामा पेंदाम, रमेश वाघाडे, आनंद गजभिये, अंकित परमार, पांडूरंग मडावी, सरिता भोयर, दयाराम रहेले यांनी सुध्दा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल, तालुका प्रमुख अजय पालीवाल, मोरेश्वर सौंदरकर,अश्विन गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.

Exit mobile version