राज्यसरकारच्या विरोधात आमगाव, गोरेगाव व तिरोड्यात भाजपचे धरणे आंदोलन

0
435

गोंदिया,दि.२५ः- जिल्ह्यातील आठही तालुक्यात २५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीसह महागाई व महिलांवरील अत्याचारासोबतच विविध क्षेत्रातील कामकाजामुळे जनतेचे हित साध्य होत नसल्याच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन गोरेगाव व तिरोडा तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.
शेतकèयांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे भाजपचे धरणे आंदोलन आहे. जनादेशाचा अपमान करुन सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने शेतकèयांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.भाजपाचा Ÿविश्वासघात करुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेने सत्ता स्थापन करुन शेतकèयांचा विश्वासघात केला. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकèयांच्या बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला.सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करु अशा घोषणा करणाèया महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. सरकारची कर्ज माफी योजना शेतकèयांची फसवणूक करणारी आहे.महाविकास आघाडी सरकारने शेतकèयांची फक्त अल्पमुदती पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकèयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कजार्ची नियमित परतफेड करणाèया शेतकèयांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.महिलांवर अत्याचार करणाèया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यस्त आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही.महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.अशा इतर अनेक मुद्यांच्या संदर्भाने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

तिरोडा तहसिल कार्यालयासमोर भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,बाजार समिती सभापती qचतामण रहंगडाले,वाय.टी.कटरे.डॉ.वसंत भगत,माजी आमदार भजनदास वैद्य,देवेंद्र तिवारी,मदन पटले,स्वानंद पारधी,चतुर्भूज बिसेन,एड.माधुरी रहागंडाले,उपसभापती ढिंकवार उपस्थित होते.गोरेगाव तहसिल कार्यालयासमोर आयोजित धरणे मंडपात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,तालुकाध्यक्ष डॉ.साहेबलाल कटरे,समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, नितीन कटरे,दिलीप चौधरी,डॉ.लक्ष्मण भगत,माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहागंडाले,सुरेश रहागंडाले,नगराध्यक्ष आशिष बारेवार,जगदिश बोपचे,मोरेश्वर कटरे,विजय राणे,पुष्पराज जनबंधु आदी उपस्थित होते.आमगाव तहसिल कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात माजी आमदार केशवराव मानकर,भैरसिंहनागपूरे,तालुकाध्यक्ष काशीराम हुकरे,घनश्याम अग्रवाल,पिंटू अग्रवाल,हरिहर मानकर,राजु पटले,राकेश शेंडे,जयप्रकाश शिवनकर,श्यामू मोदी,कमलेश चुटे,अनिल शेन्डे,जगमोहन पाथोडे, लक्ष्मण चुटे,भरत चुटे,सरोज कोसरकर,अशोक पटले आदी कार्यकर्ता उपस्थित होते.