एकनाथ खडसें जाणार राज्यसभेवर ?

0
148

मुंबई,दि.07 : राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून राजकीयदृष्ट्या अडगळीत पडलेले व काही दिवसांपूर्वी पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच ही खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे आधीच निश्चित केली आहेत. तिसऱ्या नावासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस होती. संजय काकडे यांनी तर उदयनराजे यांच्या नावाला विरोध दर्शवत दुसऱ्या जागेवर दावा ठोकला होता. मात्र, आता त्यांचे नाव मागे पडल्याचं दिसत आहे. त्यांच्या जागी खडसे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.