भोपाळ- शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे 32 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवराज मध्यप्रदेशच्या इतिहासात, चारवेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले नेते आहेत. यापूर्वी ते 2005 ते 2018 पर्यंत सगल 13 वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. 20 मार्चला कमलनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर सीएम पदाच्या शर्यतीत शिवराज सिंह सर्वात प्रमुख् दावेदार होते. शिवराज यांच्याशिवाय आतापर्यंत अर्जुन सिंह आणि श्यामाचरण शुक्ल तीन-तीन मुख्यमंत्री झाले आहेत.
गोपाल भार्गव यांचा राजीनामा, शिवराज सिंह गट नेतेपदी
यापूर्वीच भाजप आमदारांच्या बैठकीत गोपाल भार्गव यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यानंतर आमदारांची बैठक सुरू झाली. बैठकीत शिवराज सिंह आणि प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा उपस्थित होते. गोपाल भार्गव यांनी शिवराज सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. शर्मा यांनी त्याचे समर्थन केले. बैठकीत मोजकेच आमदार उपस्थित होते, कोरोनामुळे आमदारांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी सर्व आमदारांनी शिवराज यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केला आणि त्यांची गटनेतेपदी निवड केली.
उत्सव आणि जल्लोष करण्यासाठी वेळ नाही, कोरोनाशी सामना करायचा आहे- शिवराज
शिवराज सिंह चौहान आमदारांच्या बैठकीत म्हणाले की, माझ्यासाठी आज खूप भावूक क्षण आहे. भाजप माझी आई आहे आणि आईच्या दुधाचे कर्ज फेडण्यासाठी वाटेल ते करेल. काँग्रेस सरकारने सर्व गोंधळ घातला आहे. शासन करण्याच्या शैलीत आता परिवर्तन केले जाईल. आता आमचे कामच बोलेल. जनकल्याणाचा इतिहास रचणार. ही उत्सवाची वेळ नाही, परिस्थिती आम्हाला जल्लोष करण्याची परवानगी देत नाही. आथा आम्हाला कोरोनाशी सामना करायचा आहे. ज्या भावना मोदीजींनी व्यक्त केल्या आहेत, त्या भावनांशी आम्हालाही जुडायचे आहे. संक्रमणाची चैन आम्हाला तोडायची आहे. शपथग्रहणानंतर थेट कार्यालयात जाईल आणि कोरोनाशी सामना करण्याच्या उपाययोजना करेल.