गोंदिया,दि.23ः- सध्या आयपीएल क्रिकेटची धूम असली तरी आयपीएल क्रिकेट सामन्यावरून सट्टेबाजार देखील तेजीत आला आहे. सट्टा लावण्यांची आधुनिक पद्धत देखील सट्टाबाजांनी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जुने-नवीन सट्टेबाज सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
आधुनिक ऑनलाईन सट्टेबाजार सध्याच्या स्थितीत सक्रिय झालेला आहे. विविध प्रकारच्या वेबसाईट आणि मोबाईल अँपद्वारे आधुनिक सट्टेबाजी सुरू आहे. वेबसाईट आणि अँपद्वारे एक ‘युआरएल लिंक’ बनवून त्याद्वारे सट्टे लावणारे या वेबसाईड आणि अँपवर लॉगिंन करून सट्टा लावीत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी नेमूण दिलेले एजंट याची रोख रक्कम घेतात आणि त्यांचे पाईंट तयार करून प्रत्येक सामन्यांवर ओव्हर, विकेट, शेसन, मॅच कोण जिंकणार या गोष्टीवर सट्टा लावल्या जातो. जिल्ह्यात दररोज जवळपास एक कोटी रक्कमेची सट्टाबाजारावर उलाढाल होत असल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आलेली आहे.
विशेषत: सट्टा बाजारात जिल्ह्यातील ८0 टक्के युवा पीढी सक्रीय असल्याची माहिती जाणकारांकडून प्राप्त झालेली आहे.त्यातच गोंदियाच्या मुर्री भागातील एका काॅलनीत मोठ्याप्रमाणात क्रिकेट बुकींचे तसेच शहरातील नामाकिंत नगरात वास्तव्य असून सध्या कोरोना काळातही त्यांनी आपले व्यवसाय शांतठिकाणी सुरु केल्याचे वृत्त आहे.सिव्हील लाईन भागातील एक बुकी तर हा शासकीय वसाहतीच्या भागाला लागूनच असल्याने त्याठिकाणी सुध्दा चहलपहल दिसायला सुरवात झाली आहे. एखाद्या जिल्ह्याचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे काम युवा पीढींच्या खांद्यावर असते. मात्र जिल्ह्यातील युवा पिढी सट्टा बाजारात सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यातील समाजसेवक तसेच पालकांनाकरिता मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जिल्ह्यात जोमाने सुरू असलेल्या सट्टा बाजारावर पोलिस विभागाने आळा घालून संबंधित सट्टाबाजार भरविणार्या एजंटवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.