मुंबई इंडियंसला दुसरा झटका, क्विंटन डिकॉकनंतर सुर्यकुमार यादव आउट, रोहित शर्माने मारली आयपीएलमधली 37 वी फिफ्टी

0
154

आयपीएलच्या 13 व्या सत्राचा 5 वा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात अबुधाबी येथे सुरू आहे. कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या शिवम मावीने मुंबईच्या क्विंटन डिकॉकला झेलबाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव रनआउट झाला. सध्या क्रीजवर रोहित शर्मा आणि सौरभ तिवारी आहेत. रोहितने आयपीएल करिअरमधली 37 वी फिफ्टी मारली आहे. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

या मैदानावर मुंबईने आतापर्यंत दोन सामने खेळले असून या दोन्हीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. येथे या मोसमातील संघाने सलामीचा सामना खेळला, त्यात चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेट्सने पराभव केला. यापूर्वी 2014 मध्ये केकेआरने 41 धावांनी पराभूत केले होते.

दोन्ही संघ

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

कोलकाता: सुनील नरेन, शुभमन गिल, नीतीश राणा, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), निखिल नाइक, पैट कमिंस, पैट कमिंस, कुलदीप यादव, संदीप वॉरियर आणि शिवम मावी.

युएईमधील रेकॉर्ड

युएई मधील मुंबईचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. 2014 लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे पहिले 20 सामने युएईमध्ये झाले होते. तेव्हा मुंबईने येथे 5 सामने खेळले आणि सर्वात त्यांचा पराभव झाला होता. तर, युएईमध्ये केकेआरने 5 पैकी 2 सामने जिंकले आणि 3 गमावले. केकेआरने अबू धाबीमध्ये 3 सामने खेळले, 2 जिंकले आणि 1 पराभूत झाला.

मुंबईने 4 वेळा आणि कोलकाताने 2 वेळा जेतेपद जिंकले

मुंबईने आयपीएलच्या इतिहासात 4 वेळा (2019, 2017, 2015, 2013) जेतेपद जिंकले आहे. मागच्या वेळी मुंबईने अंतिम सामन्यात चेन्नईचा 1 धावानी पराभव केला होता. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामना खेळला आहे. त्याच बरोबर, कोलकाताने आतापर्यंत दोनदा (2014, 2012) अंतिम सामना खेळला आहे आणि दोन्ही वेळा चॅम्पियन बनले आहे.

आयपीएलमधील मुंबईचा सक्सेस रेट केकेआरपेक्षा 57.44% अधिक आहे

लीगमध्ये मुंबई इंडियन्स 188 पैकी 109 सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे. टीमचा सक्सेस रेट 57.44% आहे. मुंबईने आतापर्यंत 79 मॅच हरले आहेत. तर, केकेआरने आतापर्यंत 178 पैकी 92 सामने जिंकले तर 86 हरले. संघाचा सक्सेस रेट 52.52% आहे.

केकेआरला मुंबईविरुद्धच्या शेवटच्या 10 सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकता आला

आतापर्यंत मुंबई आणि केकेआर दरम्यान 25 सामने खेळले गेले आहेत. यात मुंबईने सर्वाधिक 19 सामने जिंकले, तर त्याला 6 सामन्यात पराभव पत्करावे लागले. गेल्या 10 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईला एकदाच पराभूत करू शकला आहे. जर मुंबई संघाने आजचा सामना जिंकला तर एका संघाविरुद्ध 20+ सामने जिंकणारा हा पहिला संघ असेल.

केकेआरसाठी कार्तिक, रसेल आणि नरेन की-प्लेयर्स

कोलकाताला ऑफ स्पिनर आणि ओपनर फलंदाज सुनील नरेनसोबतच आंद्रे रसेलकडून सर्वात जास्त आशा आहे. परंतू, सीपीएलमध्ये रसेल गोलंदाजी करताना फारसा दिसला नाही. 2019 सीजनमध्ये रसेलने आक्रामक फलंदाजी करत 52 षटकार ठोकले होते. आयपीएलमध्ये रसेलचा सर्वात जास्त 186.41स्ट्राइक रेट आहे.

रोहित, हार्दिक आणि पोलार्डवर मुंबईला आपला पहिला विजय मिळवून देण्याची जबाबदारी

कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि किरोन पोलार्डवर मुंबईला या सीजनमधील पहिला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. सूर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी मिडल ऑर्डरमध्ये दिसू शकतात. तर, बॉलिंग डिपार्टमेंट जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ड आणि जेम्स पॅटिंसनवर अवलंबून आहे.