
गोंदिया,दि.27ः पुणे येथे झालेल्या किक बॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेत सुर्वण पदक प्राप्त करुन गोंदिया जिल्ह्याचे नावलौकिक मिळवून देणार्या कु.परी तेजसिंग आलोत व कु.यशस्वी मयुर राठोड या बंजारा कन्यांचे समाजाकडून सत्कार करण्यात आले.
पुणे येथे पार पडलेल्या वाको इंडिया राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत परी आलोत व यशस्वी राठोड या दोन्ही मुलींने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत दोन सुर्वण पदक प्राप्त करुन गोंदिया जिल्ह्याचे नावलौकिक केले.यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले गुरु तेजसिंग आलोत ,अंजनकर सर व आपले आई वडिल यांना दिले.
सत्कार कार्यक्रमात या मुलींच्या यशामध्ये गुरु म्हणून ज्यांचा मोठा योगदान होते ते म्हणजे तेजसिंग आलोत यांचा देखील सत्कार वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व समाजाकडून करण्यात आले.
सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबुसिंग राठोड,प्रमुख उपस्थिती श्री.मॅकलवार,श्री.तुरकर,विलास राठोड,संगिता राठोड,शोभा आलोत,दिलिप राठोड,मयुर राठोड हे उपस्थित होते.
तसेच संघटनेचे सर्व सर्व पदाधिकारी मुरली चव्हाण,सुरज राठोड,मोरेश्वर राठोड,नितिन आडे,संदिप राठोड, यांच्या उपस्थिति व सहकार्याने पार पडले.कार्यक्रमात समाजाबांधवाने परी व यशस्वी यांचे अभिनंदन व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचलन प्रदिप राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजित राठोड यांने केले.