क्रीडा प्रबोधीन पुणे येथे 12 जुलै रोजी खेळाडूंची जलतरण निवड चाचणी

0
17

वाशिम, दि.08 : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधीनीमध्ये जलतरण खेळाच्या प्रशिक्षणाकरीता व संघ उभारणीकरीता नव्याने खेळाडू भरतीकरीता ८ ते १६ या वयोगटातील खेळाडूंची निवड चाचणीचे आयोजन  १२ जुलै २०२२ रोजी सकाळी ८ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे करण्यात आले आहे. निवड चाचणीकरीता खेळाडू किमान राज्यस्तरावर सहभागी असणे आवश्यक कौशल्य चाचणी, खेळाडू राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य असावा ही मानके निश्चित करण्यात आलेली आहे.

           निवड चाचणीचे निकष पुढीलप्रमाणे आहे. खेळाडूंची उंची, शारीरीक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी, जलतरण चाचण्या ५० मीटर फ्री,१०० मीटर मेन स्ट्रोक व ४०० मीटर फ्रीस्टाइल १४ वर्षाच्या आतील, ८०० मीटर फ्री स्टाईल, १४ वर्षावरील, ८०० मीटर धावणे शोल्डर लॅन्थ इत्यादी फक्त निवड चाचणी खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवास व भोजन खर्च स्वतःला करावा लागेल. चाचणीस येतांना खेळाडूंनी जन्म तारखेचा दाखला सोबत आणावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या जलतरण निवड चाचणीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.