राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल व रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0
11

 गोंदिया,दि.3 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया च्या वतीने राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल (14 वर्ष मुले/मुली) व रोलबॉल (17/19 वर्ष मुले/मुली) क्रीडा स्पर्धेचे दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे यशस्वी आयोजन करण्यात आले.

         बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत 14 वर्ष मुला-मुलींमध्ये मुंबई विभाग अव्वल तर रोलबॉल मध्ये 17 वर्ष मुले मध्ये नागपूर विभाग व मुलींमध्ये पुणे विभाग तसेच 19 वर्ष मुलांमध्ये पुणे विभाग व मुलींमध्ये कोल्हापूर विभाग अव्वल ठरला.

        राज्यस्तरीय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे. 14 वर्ष मुले मध्ये प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग, तृतीय अमरावती विभाग व 14 वर्ष मुली मध्ये प्रथम क्रमांक मुंबई विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग, तृतीय पुणे विभाग. 17 वर्ष मुली मध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग, तृतीय मुंबई विभाग तसेच यांनी रोलबॉल क्रीडा स्पर्धा 19 वर्ष मुले मध्ये प्रथम क्रमांक पुणे विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग, तृतीय नाशिक विभाग व 19 वर्ष मुली मध्ये प्रथम क्रमांक कोल्हापूर विभाग, द्वितीय पुणे विभाग, तृतीय नाशिक विभागाने आपले नाव कोरले.

        या स्पर्धा तीन दिवसापासून गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाल्या. सर्व विजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना ट्राफी वितरीत करण्यात आले व खेळाडूंचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

        बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, प्रा.डॉ.अस्वीन चंदेल एस.एस.जे.सीनियर कॉलेज अर्जुनी/मोर, हेमंत बाळबुध्दे नागपूर बास्केटबॉल संघटना, रवि कुलकर्णी सरस्वती विद्यालय नागपूर, सी.पी.जेम्स फादर चावळा हायस्कुल वडसा, अमित पाटील सहसचिव म.रा.रोलबॉल असोसिएशन कोल्हापूर, प्रभाकर वडवेराव पुणे, रफीक इनामदार पुणे, डॉ.आनंद मकवाना सचिव रोलबॉल संघटना गोंदिया, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

       बास्केटबॉल स्पर्धेचे पंच म्हणून प्रकाश लोखंडे ब्रम्हपुरी, विनोद गोस्वामी नांदेड, अस्वीन कोस ब्रम्हपुरी, सागर कटरे गोंदिया, दिपक आम्बेडारे गोंदिया, हर्ष टेंभरे गोंदिया तर रोलबॉल स्पर्धेकरीता डॉ.आनंद मकवाना गोंदिया, अनिकेत सिंगनधुपे गोंदिया, आकाश पांतावणे गोंदिया, नैसल अली गोंदिया, विप्लन वाघाई गोंदिया, प्रभाकर वडवेराव पुणे, रफीक इनामदार पुणे, रवि चौगुले कोल्हापूर, आदित्य सुतार कोल्हापूर, अभिजीत सुतार कोल्हापूर व चंदन जैसवाल मुंबई यांनी काम पाहिले.

        समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवर व पंचांचे मोमेन्टो देऊन स्वागत करण्यात आले. स्पर्धेचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले.

        स्पर्धेच्या यशस्तीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके, भारत स्काऊ-गाईडचे जिल्हा समन्वयक चेतना ब्राम्हणकर व पराग खुजे, धनंजय भारसाकळे, विकास कापसे, श्री राऊत, श्री सागर, अंकुश गजभिये, अतुल बिसेन, विनेश फुंडे, शिवचरण चौधरी, किसन गावड, आकाश भगत, नरेंद्र कोचे, वसंत विहिरघरे, शेखर बिरणवार, जयश्री भांडारकर तसेच संबंधीत खेळाचे क्रीडा शिक्षक व पंच यांनी सहकार्य केले.