
अर्जुनी मोर.(सुरेंद्रकुमार ठवरे)- फुटबॉल खेळाला जगात अन्यन साधारण महत्व आहे.या आंतरराष्टीय फुटबॉल खेळाचे स्पर्धात्मक सामने गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोर. तालुक्यातील बंगाली वसाहत असलेल्या अरुणनगर गावात एवढी मोठी स्पर्धा होणे हे तालुक्यासाठी भुषणावह आहे. फुटबॉल खेळ हा बंगाली बांधवांचा आत्मा आहे. गेल्या 40 वर्षापासून या गावात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होणे व या स्पर्धेसाठी महाराष्ट्र,मध्यप्रदेश,छत्तीसगड राज्यातील फुटबॉल संघ येणे हे तालुक्यासाठी व बंगाली बांधवांसाठी गौरवाची बाब आहे. या स्पर्धातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल खेडाळु तयार व्हावे असा आशावाद माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे.
युवा सांस्कृतिक व क्रीडा असोसिएशन अरुण नगर द्वारा आयोजित फुटबॉल स्पर्धा 2023 च्या बक्षीस वितरण( ता.14 ) कार्यक्रमाप्रसंगी राजकुमार बडोले बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच मीनती कीर्तुनिया होत्या. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे गटनेते लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, पंचायत समिती सदस्य डॉक्टर नाजूक कुंभरे, गौरनगर चे सरपंच विकास वैद्य, खरेदी-विक्रीचे संचालक टीकाराम नाकाडे; खोकण सरकार, वासुदेव बाईन, बिरेन सरकार, शैलेंद्र मलिक; भावेश बॅनर्जी, सुजित कीर्तुनिया, समर सरदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, संपूर्ण बंगाली वसाहत असलेल्या अरुणनगर येथे गेल्या 40 वर्षापासून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पूर्वी हा खेळ मनोरंजन म्हणून खेळला जायचा, सन 2008 पासून या खेळाला स्पर्धात्मक स्वरूप आले. यावर्षी नागपूर; अमरावती, अकोला, बालाघाट, गडचिरोली, गोंदिया ,ब्रह्मपुरी, वासिम ,भंडारा, जळगाव, बिलासपूर, चंद्रपूर, अकोला, जिल्ह्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून तसेच अरुणनगर, गौरनगर या बंगाली वसाहती मधील असे एकूण 32 फुटबॉल संघ सामील झाले होते. आठ ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा चालली, प्रथम 50 हजाराचा बक्षीस व ट्रॉफी नेताजी फुटबॉल संघ अरुणनगर तर द्वितीय 25 हजाराचे बक्षीस व ट्रॉफी बालाघाट येथील संघाने पटकाविला, यावेळी उत्कृष्ट खेळाडूंनाही पारितोषिक माजी मंत्री राजकुमार बडोले व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवा सांस्कृतिक व क्रीडा असोसिएशन अरुणनगरचे अध्यक्ष बलराम दास, शशी गाईन, प्रशांत परिमल वैद्य, निपण मंडल, गोविंद हालदार, देवकुमार सरदार व अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.