जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023 – 24 एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सुयश

0
11

गोंदिया,दि.01-जीवनात प्रत्येकाला एकतरी छंद असणे आवश्यक आहे. प्रत्येक युवकांत काहीतरी सुप्त गुण असतात, परंतु त्यांना पाहिजे तसे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले, संस्थागारचे रोशन मडामे,सुनिल पारधी, कामगार कल्याण केंद्राचे श्री जांभूळकर, शिवचरण चौधरी व क्रिडा शिक्षक अनिल शहारे उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषी आयुक्तालयाच्या संयुक्त वतीने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुध्दीस्ट समाज संघ संथागार, मरारटोली, येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक, कौषल्य विकास, संकल्पना आधारीत स्पर्धा व युवा कृती वयोगट 15 ते 29 युवक/युवतीचे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.
त्यामध्ये एम.जी. पॅरामेडिकलचे विद्यार्थी रक्षा बुधराम पटले, विनु अंगद कावरे, सुमेधा गुलाब देशपांडे, पुजा रमेश येळे, तनुजा महेन्द्र चिकलोंडे, पुजा नरेश भगत, वैष्णवी दिलिप मेश्राम, पल्लवी देवेन्द्र रहांगडाले, स्वाती चींतामन खोटेले आणी करिष्मा मनोहर इटवले यांनी पथनाट्यामध्ये प्रथमक्रमांक रू. 5,000/- व सन्मानपत्र देवून गौरवीण्यात आला. तसेच समुह लोकनृत्यमध्ये स्वाती चिंतामन खोटेले, प्रेरणा हेमचंद पटले, अर्निका मनोज बडोले, खुषबु विजय वालदे, निषा मनोहर गौतम आणी करिष्मा मनोहर इटवले यांनी तृतीयक्रमांक रू. 3,000/- व सन्मानपत्र तसेच वैयक्तिक लोकनृत्यमध्ये स्वछतानिरिक्षक या कोर्सची विद्यार्थीनी नेहा उमराज ठाकुर यांनी तृतीयक्रमांक रू. 1,500/- व सन्मानपत्र देण्यात आले.
कॉलेजची अध्यक्षा मनसरबाई गोंडाने, संचालक अनिल गोंडाने,प्रियंका गेडाम, प्राचार्या अनुसया लिल्हारे, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. प्रीति वैद्य, प्रा. छाया राणा, प्रा. रामेष्वरी पटले, प्रा. मनीष चौधरी,राजू रहांगडाले,सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे, योगेष्वरी ठवरे व रूपाली धमगाये यासर्व कर्मचाÚयांनी अथक परिश्रम घेतले. सर्व यषस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संचालक अनिल गोंडाने यांनी कौतूक केले आहेे.