अटल क्रिडा स्पर्धेत नियोजनाचा अभाव,पहिल्याच दिवशी विद्यार्थी उपाशी

0
32

गोंदिया,दि.21– गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे आयोजित “अटल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव – २०२३”चे आयोजन आज 22 डिसेंबरपासून येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व जिल्हा परििषदेचे सभापती व इतर मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेच्या पत्रिकाप्रकाशनापासूनच वादातीत असलेली ही स्पर्धा आज स्पर्धेच्या उदघाटनाच्यादिवशीही चर्चेत राहीली ती विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्याने.अटल क्रिडा स्पर्धेच्या नियोजन समितीच्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांसह आलेल्या शिक्षक व अंगणवाडी सेविकांनाही बसला.येणार्या खेळाडू विद्यार्थ्यांसह शिक्षक व इतरांच्या संख्येचे गणित जुळवता न आल्याने पहिल्याच दिवशी अर्ध्या विद्यार्थ्यांना नास्ता मिळाला नाही तर काहींना जेवणही मिळाले नाही.एका तालुक्यातील शिक्षकांने सांगितले की आपल्या विद्यार्थ्यांना आता सामने सुरु होण्याची वेळ सायकांळची आली पण जेवणच मिळाले नाही.तसेच विद्यार्थ्याकरीता विमा कवच काढण्यात येणार होते,मात्र स्पर्धेा सुरु होऊनही आमच्या विद्यार्थ्यांचा विमा निघाला नसल्याचे सांगितले.

या अटल क्रिडा व साँंस्कृतिक स्पर्धेच्या जिल्हास्तरावर 8 तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक विभागातील खो खो व कबड्डी चमू सहभागी झाल्या.एका तालुक्यातील खो-खो च्या 4 व कबड्डीच्य 4 चमू,सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थी वेगळे,सांघिक खेळातील वेगळे,लेझीमचे वेगळे असे एका तालुक्यातून 200 च्या जवळपास विद्यार्थांचा जिल्हास्तरावर सहभाग पकडल्यास 8 तालुक्यातील 1600 विद्यार्थी संख्या होते.त्यांच्यासोबत शिक्षक,शाळेतील स्वंयपाक तयार करणारी बाई हा आकडा मात्र नियोजनात पकडण्यातच आलेला दिसून येत नाही.1200 खेळाडूसंह शिक्षकांची संख्या नियोजनात घेतल्याने पहिल्याच दिवशी जेवण व नाश्त्याच्यावेळी फज्जा उडाल्याने सर्वच शिक्षक संघटनांचे नेते व इतर शिक्षक जेवणावरच चर्चा करतांना दिसून येत होते.तर काहींंनी जिल्हास्तरवार जे कार्यवाह बनले त्यांच्या नियोजनातही चूका असल्याचे सांगितले.