Home क्रीडा फायनलमध्‍ये पोहोचली सायना

फायनलमध्‍ये पोहोचली सायना

0
वृत्तसंस्था
सिडनी- भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने चीनच्‍या वांग यिहानचा सरळ सेटमध्ये पराभव करुन, ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजच्‍या अंतिम फेरीमध्‍ये प्रवेश केला आहे. 7.5 लाख डॉलर बक्षिस असलेल्‍या या स्‍पर्धेच्‍या सेमीफायनलमध्‍ये यिहानला 21-8 आणि 21-12 अशा फरकाने पराभव पत्‍करावा लागला. आता तिची अंतिम लढाई चीनच्‍या सूं यूसोबत होणार आहे. 
– 26 वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटूने जबरदस्त फरफॉर्म केला आहे.
– तीने पुन्‍हा एकदा चायनीज स्टारचा टिकाव लागू दिला नाही.
– पहिल्‍या सेटमध्‍ये सायनाने 13-3 अशी आघाडी घेतली होती.
– पहिल्‍या सेटमध्‍ये सायनाने 21-8 ने आघाडी नावावर केली.
दूस-या सेटमध्‍ये..
– पहिल्‍या सेटप्रमाणे दूस-या सेटमध्‍येही सायनाने आक्रामक सुरुआत केली.
– तिने 11-4 अशी आघाडी घेतली.
– सायना सलग प्वाइंट्स घेऊन 20 पर्यंत पोहोचली.
– हा सेट 21-12 वर समाप्‍त झाला.
– दोन्‍ही खेळाडूंमध्‍ये ही 16 वी मॅच होती.
– याआधी 11 वेळा यिहानने नेहवालला पराभव केला होता.

Exit mobile version