
सांगली,दि.२२ः महाराष्ट्र शासना कडून घेण्यात येणाऱ्या १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेसाठी जिल्हा परिषद शाळा विसापूर नं १ येथील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी चि.सोहम दीपक माने याची खंडाळा जि. सातारा याठिकाणी होणाऱ्या विभागीयस्तर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघामधून निवड झाली.सोहमला इथेपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी सांघिक शक्ती दाखवत जिद्दीने कौशल्य दाखविले त्या आमच्या शाळेच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. सोहम यास प्रेरणा व प्रोत्साहन त्याचे आई वडील , पं स तासगाव चे गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड,विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रमेश राऊत यांचे व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक दिपक काळे,मुनाफ नदाफ व विसापूर मधील युवा खेळाडू अभिजित पाटील , धीरज गायकवाड , ऋषिकेश , मयूर , विनय , रोहित व सर्व युवा सहकारी तसेच शाळा नं १ व २ चे सर्व शिक्षक यांचे लाभले.