
बॅटिंग केलीय वाघानं अन् राज्यात पोहोचलाय आपल्या खेळानं.
सांगली,दि.०८- सातारा जिल्ह्यातील खंडाळा याठिकाणी ७ नोव्हेंबरला पार पडलेल्या महाराष्ट्र शासन आयोजित १४ वर्षाखालील वयोगटाखालील मुले / मुली खो खो या क्रिडा स्पर्धेत सांगली जिल्ह्यातून निवड झालेला जिल्हा परिषद शाळा विसापूर नं १ शाळेचा इयत्ता ६ वीचा विद्यार्थी सोहम दीपक माने हा विभागीय स्पर्धेतील निवड चाचणीत पात्र ठरला असून त्याची डेरवण ता. चिपळूण जि. रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोहम यांस मार्गदर्शन वर्गशिक्षक दीपक काळे,विसापूर मधील युवा खेळाडू अभिजित पाटील , धीरज गायकवाड , ऋषिकेश,मयूर,अनिल,रोहीत व सर्व युवा सहकारी तसेच मुनाफ नदाफ,सागर पाटील व शाळा नं १ व २ च्या सर्व शिक्षकाचे लाभले.
प्रेरणा व प्रोत्साहन जिल्हा परिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती दोडमिसे , शिक्षणाधिकारी सांगली प्राथमिक मोहनराव गायकवाड,गटविकास अधिकारी पंचायय समिती तासगाव किशोर माने,गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड,शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख रमेश राऊत सर यांचे लाभले.