आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर

0
9
शिबीरातील खेळाडूंना डॉ. अजय दहात्रे, अस्थिरोग तज्ञ यांचे मार्गदर्शन
वाशिम,दि.१३ मे – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील विविध खेळ संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत जिल्हयात राज्य व राष्ट्रिय स्तरावरचे विविध खेळांचे खेळाडु तयार व्हावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याकरीता खेळाडुंना विविध खेळांचे अनुभवी प्रशिक्षकांकडुन खेळाची तंत्रशुध्द मार्गदर्शन व नियमांची सर्व माहीती मिळावी हा दृष्टीकोन समोर ठेवुन जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीर २८ एप्रिल पासून पासुन जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे सुरु आहे.
जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीर दरम्यान आयोजित कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजय दहात्रे अस्थिरोग तज्ञ, गुरुकृपा हॉस्पिटल वाशिम यांची उपस्थिती लाभली. तसेच लता गुप्ता, जिल्हा क्रीडा अधिकारी, मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी, रणजित कथडे, राजदिप मनवर, अनिल थडकर, नारायण ठेंगडे, साहिल राऊत, विजय धोंगडे, विक्की खोब्रागडे, अर्शद सय्यद, सुनिल देशमुख इत्यादी खेळांचे तज्ञ प्रशिक्षक मंचकावर उपस्थित होते.
डॉ.दहात्रे यांनी खेळाडुंना सरावामध्ये होणाऱ्या दुखापत व इजा बाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गुप्ता यांनी खेळाडुंना उन्हाळी प्रशिक्षण का घेतले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले. तसेच खेळाडुंचा उत्साह वाढावा याकरीता श्री. कथडे, श्री. थडकर यांनी मार्गदर्शन करत खेळाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पुजा भटकर यांनी केले.