राष्ट्रीय स्पर्धसाठी बोरगावच्या मनीष मेश्रामची निवड

0
43

चित्रा कापसे/तिरोडा- तालुक्यातील वडेगावच्या येथील मनीष मेश्राम याने नागपूर येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर अंडर 20 गटात 5km किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये हे अंतर 14 मिनिट 48 सेकंदात पार करून गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून 23 जूनला प्रयागराज येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मनीष मेश्राम महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे त्याला या स्पर्धेसाठी वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस.पी. ठाकरे व क्रीडा शिक्षक प्रितेश भांडारकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे राष्ट्रीय स्पर्धसाठी यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.