चंद्रपूर येथे ०६ वी जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनिअर व ज्युनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी

0
8

चंद्रपूर :-दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनिअर व ज्युनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी दिनांक २५ मे  २०२५ रोजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात आली होती. या निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन निवड चाचणीचे अध्यक्ष व सदर असोसिएशन अध्यक्ष प्रा. डॉ. अनीस अहमद खान संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख महात्मा गांधी सायन्स कॉलेज, गड़चांदुर व दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर हे उपस्थित होते. सदर जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणीमधे मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या जिल्हास्तरीय निवड चाचणीमधे प्रास्ताविक करताना प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांनी टेनिस बॉल क्रिकेट या खेळाबाबत संपूर्ण माहिती सर्व खेळाडुंना समजावून सांगितली व निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. कुलदीप गोंड, संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांनी खेळाडुंना खेळाबद्दलचे महत्व समजावून सांगितले तसेच अध्यक्षीय भाषणात  प्रा. डॉ. अनीस अहमद खान यांनी खेळ व खेळाडूवृती याबाबत भाषण केलेत्या नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे पूजन करून सर्व खेळाडुंना शुभेच्या देऊन निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर निवड समितिद्वारे निवड चाचणीसाठी आलेल्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंचे निवड चाचणी घेण्यात आली व निवड झालेला संघ साकोली, जिल्हा भंडारा येथे दिनांक ०९ ते ११ जून  २०२५ रोजी १५ वी मिनी सब ज्युनिअर व १७ वी सब ज्युनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

 या सदर निवड चाचणीत दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूरचे सहसचिव सुरज परसूटकर, कोषाध्यक्ष रुचिता आंबेकर,वर्षा घटे,हर्षल क्षिरसागर ,चंदन परसूटकर,मयुर बोनमपल्लीवार,  नरेश चंदेल कु. श्रुती घटे,स्वप्नील धोडरे हे उपस्थित होते.