जलतरण पटू शासृति नाकाडे व कुस्ती पटू हितेश सोनवाणे यांना मदत निधीचे वाटप

0
44

कोहळी समाज विकास मंडळाचा पुढाकार

शश्रुती नाकाडे इंग्लिश बे स्विमिंगसाठी रवाना

गोंदिया- कोहळी समाज विकास मंडळ नागपूर कोहळी समुदायाच्या वतीने,राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू शश्रुती विनायक नाकाडे आणि कुस्तीगीर हितेश सोनवणे यांच्या सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी काही आर्थिक खर्च उचलण्यास मदत करण्यासाठी ‘एक हात मदत’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत, समुदायाच्या सदस्यांनी एकूण ४ लाख २५ हजार रुपये जमा केले. हा मदत निधी कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळ बुद्ध यांच्या प्रकाश पर्व कार्यालयात वितरित करण्यात आला. येथून शश्रुती नाकाडे इंग्लिश बे स्विमिंगसाठी रवाना झाली.

केंद्रीय कार्याध्यक्ष उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे, सचिव माणिक लोथे, गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, सदस्य प्रकाश गहाणे, हितेश ठिकरे, रवी परशुरामकर, डॉ. गजाजन डोंगरवार, ओंकार कापगते, दिलीप लोदी यांच्या उपस्थितीत सदर मदत निधीचे धनादेश शाश्रुतीचे वडील विनायक नाकाडे आणि कुस्तीगीर हितेश सोनवणे यांना सुपूर्द करण्यात आले. मंडळाने भविष्यातही समाजाच्या वतीने या प्रतिभावान आणि क्रीडापटू मुलांना मदत करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही खेळाडूंनी समाजाचे आभार मानले आणि मुलांच्या यशात समाजाचाही वाटा आहे असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी आशिष कापगते, देवेंद्र नाकाडे, मोहन लांजे, अमृत लोगाडे, ज्ञानदेव कापगटे, नरेश परशुरामकर, वाय. एच. काशिवार, मनीषा काशिवार, नलिनी लोथे आणि इतर अनेक समाजबांधव उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, अमोल मुंगमोडे, माणिक लोठे, डॉ. राजेश कापगते, प्रकाश गहाणे, ओमप्रकाश संग्रामे, हितेश ठिकरे, रमेश बोरकर, डॉ. छाया कापगते, डॉ. नयना बोरकर, किशोर डोंगरवार, दिलीप लोदी व सर्व जिल्हा शाखा सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल मंडळाच्या सदस्यांचे आभार मानले.